प्राथमिक आरोग्य केंद्रांना जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी प्राप्त रुग्णवाहिका सुपूर्द

प्राथमिक आरोग्य केंद्रांना जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी प्राप्त रुग्णवाहिका सुपूर्द

*कोकण  Express*

*प्राथमिक आरोग्य केंद्रांना जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी प्राप्त रुग्णवाहिका सुपूर्द*

*सिंधुदुर्गनगरी*

राज्य सरकारच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिका आज जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रना सुपुर्द करण्यात आल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या रूग्णकाहिकांचे सोमवारी लोकार्पण झाले होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन १४ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका आज प्राथमिक आरोग्य केंद्रांना जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते चाव्या सुपुर्द करत ताब्यात देण्यात आल्या. यावेळी सभापती शर्वाणी गावकर, महेंद्र चव्हाण, रणजीत देसाई, सावी लोके, रविंद्र साटविलकर आदिसह जि प चे अधिकारी उपस्तित होते.

आज जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी आज दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकाच्या चाव्या दिल्या. याआधीहि राज्यसरकाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!