*भाजपा नेत्यावर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न*

*भाजपा नेत्यावर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न*

*कोकण Express*

*भाजपा नेत्यावर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न*

*पत्रकार परिषदेत राजन तेली यांचा घणाघात*

*कुवत नसल्याने केसरकर यांचे मंत्रिपद काढून घेतले-राजन तेली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार दीपक केसरकर यांना आज सडकून टीका केली.तुम्ही कसले नेते तुम्हीतर सावंतवाडी शहरा पुरते.भाजपा नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यात कुवत होती म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले. तुम्ही राज्यमंत्री होता ते ही शिवसेनेने काढून घेतले.कारण तुमच्यावर विश्वास राहिला नाही.शिवसेना काय असते हे तुम्हाला काय माहीत,तुम्ही आयत्या बिळावर आलेले आहात.आता सर्व दरवाजे बंद झाले म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन भाजपा नेत्यावर टीका करून शिवसेनेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.अशी टीका भजापा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार दीपक केसरकर यांचेवर पत्रकार परिषदेत केली.

दीपक केसरकर ८ महिने गायब असलेले आमदार आहेत. लोक भयभीत असताना अचानक काल आले.राणेंवर खालच्या शब्दांत टीका करत शिवसेनाप्रमुखांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.२०१४ मध्ये सुध्दा त्यांनी अशीच सहानभूती मिळाली होती.व सेनेची उमेदवारी मिळवली होती.
दीपक केसरकर यांना नगरपंचायत मध्ये प्रवेश नव्हता तेव्हा नगराध्यक्ष निवडणुकीत सुध्दा पाहिले नगराध्यक्ष झालेत ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मुळे,पहिल्याआमदारकीच्या निवडणुकीत केसरकर पराभूत होतीस असा पोलीस रिपोर्ट होता. शरद पवार यांनी श्री. राणे याना विचारून केसरकर याना उमेदवारी दिली होती.तेव्हा शेवटच्या सर्व प्रचार सभा खा.नारायण राणे यांनी त्यावेळी केल्या आणि दीपक केसरकर यांना निवडून आणले. या सर्व घटना आढवून जणांची नाय तर मनाची तरी लाज बाळगा आणि बोला.असा सल्ला श्री तेली यांनी दिला.

निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांचे फोटो लावला म्हणून निवडून आलात. शिवसेने कणकवलीत गद्दारी केली आणि आम. नितेश राणे यांच्यासमोर उमेदवार उभा केला.केसरकर यांनी भाजपाचे आभार मानले पाहिजेत जर सावंतवाडी,कुडाळ मध्ये भाजपाचा उमेदवार कमळ निषाणीवर दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते.
तुम्ही आयत्या बिलालवर आलात,दहशत वाद ही कारणे सोडा,तुम्ही कसले कोकणचे नेते? शहरपलीकडे तुमचे आठ माही.तुम्ही जनतेला कसे फसवले हे माहीत आहे.१ लाख सेटअप बॉक्स कुठे गेले ? चष्मा कारखाना कुठे आहे.?८०० लोकांना नोकऱ्या देणार होता.ते काय झाले.मल्टीस्पेशालिटी व्होस्पिटल करतात एकही नेत्यांचा एक दुसऱ्यात ताळमेळ नाही.भात नुकसानीचे पॅकेज दिले गुंठ्याला 100 रुपये सुद्धा येणार नाही.सत्तेतील मंडळींनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.मच्छिमार लोकांना पॅकेज हे फसवे आहेत.किती वेळ करणार फसवणूक .

जिल्हयात डॉक्टर नाहीत मेडिकल कॉलेज कसे करणार आहात? शासनाकडे पैसे नाहीत.वैभवाडी विजयदुर्ग रस्त्याची काय अवस्था आहे.एसटी स्टँड विकसित करणार असे सांगतात.तर मंत्री म्हणतात की जमिनी गहाण ठेवून कामगारांचे पगार भागवणार आहेत.अशी अवस्था या सरकारची आहे.
ज्या लोकांमुळे निवडून आलात त्याच्यासाठी काम करा.आरोग्य विभागात ५३६ पदे रिक्त आहेत,ती आधी भरा.एन आर एच एम मध्ये काम करणाऱ्या लोकांना सेवेत घ्या.जिल्हाधिकारी यांना अधिकार द्या.केंद्राच्या योजनाची पुस्तिका काढून आपला स्वार्थ साधायचा. आणि केंद्रावरच टीका करता.कोकणात भाजप चांगले काम करत आहेत.मोठ्या नेत्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही.म्हणून केसरकर यांना हा घाटाटोप सुरू आहे.
दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्री कोण देणार? नगराध्यक्ष होता ते राज्यमंत्री झालात हे मोठे समज.गृहराज्यमंत्री असताना मटका घरासमोर चालू होता.जिल्ह्यासाठी मंत्री नव्हे तर आपल्याला केसरकर याना हवे होते.म्हणून गेली वर्षभर ते प्रयत्न करत होते.आता थकले तसे आमदार नाईक यांचे नाव घेतल.सुरवातीलाच का जाहीर केले नाही.उदय सामंत हे मूळ वेंगुर्ला येथील आहेत.ते दुबई वरून आले नाहीत.त्यांना संधी दिली,तुमची क्षमता नसल्याने तुम्हाला बाजूला केले.चांदा ते बांदा ही योजना राबवली गेली पाहिजे त्यासाठी आम्ही अजित दादा ची भेट घेणार असे श्री.तेली यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!