*कोकण Express*
*कुपोषित मुलांना प्रोटीन डबे व टॉनिक वाटपाचा -रोटरी क्लब कणकवलीचा कायमस्वरूपी असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ कणकवली चे चार्टर्ड मेंबर,माजी प्रेसीडेंट,माजी असिस्टेंट गवर्नर रो, नितिन बांदेकर यांचे वाढदिवसा निमित्त कुपोषित बालकाना 60 प्रोटीन्स डबे व्हिटामिन टॉनिक कीटचे वाटप ,5 अंगणवाड़ी सेवीकेमार्फत करणेत येवून सामाजिक भान जपणेत आले आहे.
गेली काही वर्षे अश्या प्रकारे उपक्रम राबवून अनेक कुपोषित बालकांना सुदृढ बनविण्यास रोटरी क्लब तर्फे पोषण आहार प्रोटीन डबे इत्यादी देऊन सहकार्य करत असल्याने अंगणवाडी सेविका यांनी रोटरीचे आभारही मानले. रोटरी क्लब ऑफ कणकवली तर्फे सातत्त्याने अनेक सामाजिक उपक्रम घेतले जात असून रोटरी सेवा अन बंधुभाव जपत आला आहे
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे प्रेसीडेंट सर्वश्री लवु पिलनकर,सेक्रेटरी विद्याधर तायशेटे, असिस्टेंट गवर्नर दादा कुड़तरकर,दीपक बेलवलकर,नितिन बांदेकर, दीपक अंधारी,संतोष काम्बले,राजेन्द्र रावराणे,महेंद्र मुरकर,रविन्द्र मुसले,वीरेन्द्र नाचने,कोषाध्यक्ष वर्षा बांदेकर, मेघा गांगन,दिशा अंधारी,तृप्ति काम्बले अन इतर मान्यवर उपस्थित होते.