वागदे – कसवण – तळवडे रस्त्याची डागडुजी उद्योजक सतीश नाईक यांच्या सहकार्यातून

वागदे – कसवण – तळवडे रस्त्याची डागडुजी उद्योजक सतीश नाईक यांच्या सहकार्यातून

*कोकण  Express*

*वागदे – कसवण – तळवडे रस्त्याची डागडुजी उद्योजक सतीश नाईक यांच्या सहकार्यातून*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

वागदे कसवण-तळवडे या मार्गाची जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फार हलाखीची स्थिती निर्माण झाली होती. भूस्खलन होऊन रस्त्याच्या मधोमधचा भाग खचला होता व त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. परंतु उद्योजक सतिश नाईक यांच्या सहकार्यामुळे हा रस्ता गणेश चतुर्थीआधी सुरळीत झाला आहे, असा दावा वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर यांनी केला आहे.

वागदे कसवण – तळवडे मार्ग भूस्खलन झाल्याने खचून गेला होता. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना येण्याजाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता. गणेश चतुर्थीत चाकरमानी येणार असल्याने तसेच दळणवळणासाठी असणारा रस्ता खचून गेल्याने पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संभ्रमात होते. याकडे लक्ष घालत वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर यांनी उद्योजक सतीश नाईक यांच्या सहकार्यातून हा रस्ता पूर्ण केला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीआधी रस्ता वाहतुकीसाठी योग्य झाल्याने पंचक्रोशीतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत, असे वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!