*कै. विठ्ठल नाना गवस यांची पुण्यतिथी साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..*

*कै. विठ्ठल नाना गवस यांची पुण्यतिथी साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..*

*कोंकण एक्सप्रेस*

*कै. विठ्ठल नाना गवस यांची पुण्यतिथी साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..*

*दोडामार्ग :गवस शुभम*

उसप येथील बापूसाहेब देसाई विद्यालयात कै. विठ्ठल नाना गवस यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक खोपडे साहेब, बाबू गवस, विद्यालयाचे मुख्याध्यापक खांडेकर सर, मोहन गवस, दशरथ मोरजकर, राजन गवस, उपशिक्षक प्रेमनाथ गवस तसेच पाडवी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!