*कोंकण एक्सप्रेस*
*दिव्यांगांना ट्रायसायकल व व्हीलचेअरचे वाटप करुन समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन*
*भाजपाच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमोहस्तवी वाढदिवसानिमीत्त वर्षभर सामाजीक उपक्रम राबवणार — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग*
*कुडाळ : प्रतिनिधि*
भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथील दिव्यांग बांधव अंकुश सर्वेकर यांना हॅडंसायकल व माणगांव येथील दिव्यांग भगीनी शबाना शेख हिला व्हीलचेअर देण्यात आली .
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले ग्रामपंचायत आवारात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर , राज्य परिषद सदस्य राजु राऊळ , जि.प. सदस्या सौ.आरती पाटील , सरपंच अक्षय तेंडोलकर , उपसरपंच अनिल भगत, दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , तेंडोली पं.स.सदस्य मंगेश प्रभु , मा.उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये , ग्रा.पं.सदस्य पाट ॠतुजा पाटकर इत्यादी उपस्थित होते .
समाजातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायपॉड, श्रवणयंत्र, अंधकाठी, हँड सायकल तसेच विविध आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले .
मान्यवरांनी आपल्या मनोगतात खासदार नारायण राणे यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत, वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला दिव्यांग बांधवांसाठीचा साहित्य वाटप उपक्रम हा सेवाभाव आणि सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून, दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी समाजाने सदैव पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग तसेच साई सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांचे विशेष सहकार्य लाभले .

