*कोंकण एक्सप्रेस*
*सांगवे तपोवन येथे रविवारपासून नामस्मरण सप्ताह*
*कणकवली ः संजना हळदिवे*
अध्यात्म ज्ञानाचे उपदेशक श्री सदगुरु परमहंस गणुबाबा सांगवेकर महाराज यांच्या श्री परमहंस सांप्रदाय श्री गणेश दत्तमंदिर, सांगवे तपोवन-कुंभारवाडी येथे रविवार 5 एप्रिल व सोमवार 6 एप्रिल रोजी नामस्मरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी पहाटे 5.45 वा. काकड आरती, सकाळी 7 वा. नित्यपूजा अर्चा, 10 वा. घटस्थापना, अखंड नामस्मरण. रात्रौ 10 वा. पंढरीनाथ जाधव बुवा यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ 11 ते 5 वा.पर्यंत श्री टेंबेस्वामी दत्तमंदिर माणगाव यांचे दिंडीभजन, सोमवार 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. पर्यंत अखंड नामस्मरण, 11 वा. घट विसर्जन, 12 वा. आरती, तिर्थप्रसाद, दुपारी 1.30 वा. महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री परमहंस सांप्रदाय यांच्यावतीने करण्यात आले आहे.

