नानेली मध्ये ​माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा

नानेली मध्ये ​माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*नानेली मध्ये ​माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा*

*सकाळी राबविले रक्तदान शिबीर, नंतर वेताळबांबर्डेतील अनाथ मुलांना मदतीचा हात…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस नानेली येथील शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला. लोकांसाठी केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबिर आणि अनाथ मुलांना मदतीचा उपक्रम राबवून या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले.

​वाढदिवसानिमित्त सकाळी नानेली गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याप्रसंगी माणगाव-नानेली पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभागप्रमुख शैलेश विर्नोडकर, सिंधु रक्तमिञ प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आणि इम्रान खुल्ली उपस्थित होते. याच वेळी गेली 35 वर्षे गावात पोस्टमन म्हणून सेवा देऊन सेवा निवृत्त झाल्याबद्दल श्री महादेव धुरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


​दुपारच्या सत्रात वेताळबांबर्डे येथील ‘एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास’ या स्वयंसेवी संस्थेला भेट देण्यात आली. ही संस्था शाळाबाह्य आणि दुर्लक्षित मुलांसाठी कार्य करते. या ठिकाणी मुलांच्या दैनंदिन गरजांनुसार जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. केवळ वस्तू देऊन न थांबता, कार्यकर्त्यांनी या मुलांशी गप्पागोष्टी करत त्यांच्यासोबत वेळ घालवला, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
​ ​यावेळी शिवसेना शाखाप्रमुख तेजस धुरी, उपशाखा प्रमुख हेमंत घाडी व संदीप नाईक, बुथप्रमुख अमित मेस्त्री, प्रशांत वारंग, ग्रामपंचायत सदस्य व युवासेना शाखाप्रमुख विनय कदम, युवासेना उपशाखाप्रमुख रोहित धूरी, प्रकाश मेस्त्री, स्वप्निल मेस्त्री, सौ. शुभ्रा धुरी आणि सौ. छाया वारंग यांसह अन्य शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या विधायक उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!