कलमठमध्ये १९ रोजी शिवजयंती उत्सव

कलमठमध्ये १९ रोजी शिवजयंती उत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठमध्ये १९ रोजी शिवजयंती उत्सव*

*शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती, कलमठ यांच्यावतीने गुरुवार १९ फेबु्रवारीला श्री देव काशिकलेश्वर मांड येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी १० वा. एसएसएस योद्धा वन प्लस पथक, बिडवाडी यांचा शिवकालीन मर्दानी खेळ, १०.३० वा. शिवकालीन दुर्मिळ नाणे व शस्त्रांचे प्रदर्शन सोहळा, ११ वा. वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी ५ वा. भव्य शोभायात्रा, ६.३० वा. शिववैभव सोहळा, ७.३० वा. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवलीनिर्मित मनोज मेस्त्री लिखित, राकेश काणेकर दिग्दर्शित बालनाट्य पडीक सादर होणार आहे. तरी शिवप्रेमींनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
…..
कलमठमध्ये १९ रोजी वक्तृत्व स्पर्धा
शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कलमठ यांच्यावतीने गुरुवार १९ रोजी कलमठ बाजारपेठ येथील श्री देव काशिकलेश्वर मांड येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांत होईल.
पहिली ते चौथी गटासाठी माझे आवडते राजे-छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील एक सुंदर प्रसंग हे विषय असून या गटासाठी अनुक्रमे ७०१ रु., ५०१ रु., ३०१ रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. तर पाचवी ते आठवी गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श आणि प्रेरणादायी जीवनकार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाडसी निर्णय किंवा प्रसंग, स्वराज्याची पायाभरणी : शिवाजी महाराजांचे शेती आणि महसूल धोरण हे विषय असून यागटासाठी १००१ रु., ७०१ रु., ५०१ रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुशांत राऊळ, नितीन उर्फ आबा मेस्त्री, नितीन पेडणेकर, प्रकाश कांबळे, धीरज मेस्त्री, अनुप वारंग, सिकंदर मेस्त्री, नितेश भोगले यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!