बाबुराव धुरी यांचा इशारा : निष्काळजी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा

बाबुराव धुरी यांचा इशारा : निष्काळजी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा

*कोंकण एक्सप्रेस*

*बाबुराव धुरी यांचा इशारा : निष्काळजी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा*

*दोडामार्ग: शुभम गवस*

दोडामार्ग : तिलारी–दोडामार्ग मार्गावरील आंबेली येथे रस्त्याचे काम सुरू असताना मोठा अपघात झाला. सकाळी दुचाकीस्वार रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने एक युवक व एक महिला गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून गोवा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी कोणतेही सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घटनास्थळी भेट देत निष्काळजी ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!