*कोंकण एक्सप्रेस*
*महायुतीचा विजयी संकल्प! अक्षता अरुण राणे यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर*
*ओसरगाव (कणकवली):*
ओसरगाव पंचायत समिती मतदारसंघातील वागदे-ओसरगाव-बोर्डवे गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. अक्षता अरुण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना निवडणूक लढवण्यासाठी सन्मानपूर्वक ‘एबी फॉर्म’ (AB Form) सुपूर्द करण्यात आला. माजी आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांनी स्वतः या उमेदवारीची घोषणा केली.
निलेशजी राणे साहेब यांनी अक्षता राणे यांना उमेदवारी जाहीर करतानाच त्यांच्या पुढील वाटचालीस आणि विजयासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, “विकासकामांच्या जोरावर महायुतीचा भगवा फडकणार,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

