जिजामाता चौक समोरील भरवस्तीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये चालू असलेली स्वाब कोरोना टेस्ट दुसऱ्या ठिकाणी चालू करा

जिजामाता चौक समोरील भरवस्तीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये चालू असलेली स्वाब कोरोना टेस्ट दुसऱ्या ठिकाणी चालू करा

*कोकण Express*

*जिजामाता चौक समोरील भरवस्तीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये चालू असलेली स्वाब कोरोना टेस्ट दुसऱ्या ठिकाणी चालू करा…………..*

*कुडाळ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे मागणी…………..*

*कुडाळ ः प्रतिनिधी:* 

कुडाळ शहर जिजामाता चौक येथील ग्रामीण रुग्णालय इमारतींमध्ये सध्या कोरोना (कोव्हिड 19) टेस्ट करण्यासाठी स्वँँब घेण्यासाठी तालुक्यातून अनेक लोक येत आहेत .सदर ठिकाणी परिसरात लोकवस्ती असून सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. तरी त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची व नातेवाईकांची गर्दी होऊन त्यांना उन्हात उभे राहावे लागत आहे .शिवाय इतर कोणतीही सोय त्या ठिकाणी उपलब्ध नाही तसेच सदर ठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी असल्याने कोरोना प्रादुर्भाव सदरील परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे व तेथील नागरिकांच्या अनेक सूचना आपल्या जवळ आले आहेत .त्यामुळे नागरिकांवर कोरोना प्रादुर्भाव ची स्थिती ओढवल्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल तरी सदर ठिकाणी लोकवस्तीपासून बदलून अन्य ठिकाणी टेस्ट केली जावी कारण येणारे नागरिक सदर परिसरातील इतरांशी संपर्कात येऊ नये तरी तात्काळ कार्यवाही व्हावी ही विनंती यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर, शहर उपाध्यक्ष सुरेश राऊळ, चेतन धुरी उपस्थित होते सदर निवेदन डॉक्टर श्री. घुर्ये यांच्याकडे सुपूर्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!