*कोंकण एक्सप्रेस*
*बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सांगुळवाडी गावाला मोठा फटका*
*वैभववाडी ः संजय शेळके*
बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सांगुळवाडी गावाला मोठा फटका बसला असून सांगुळवाडी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर झाड पडून तो किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.तर चार घरांवर झाडे पडून घरांचे मोठे नुकसान झाले.
बुधवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यात विजेच्या गडगड होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडला या वादळी वाऱ्याचा फटका तालुक्यातील सांगुळवाडी गावाला बसला आहे हरीचंद्र भाऊ रावराणे या शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून तो किरकोळ जखमी झाला त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. तर चार घरांवर आंब्याचे झाड पडून घरांचे मोठे नुकसान झाले भागीरथी भाऊ रावराणे अंदाजे 38700 रुपयांचे नुकसान विजय सदाशिव रावराणे 21 900 रुपये व दीपक केशव रावराणे 2450 रुपये चे घराचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची घटना कळतात सांगुळवाडी गावचे ग्रामसेवक विद्याधर सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

