*साळशी भाजप बुथ अध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रथमेश लाड यांची बिनविरोध निवड*

*साळशी भाजप बुथ अध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रथमेश लाड यांची बिनविरोध निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी भाजप बुथ अध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रथमेश लाड यांची बिनविरोध निवड*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी गावातील भाजपच्या बुथ अध्यक्षपदी प्रथमच एका युवा कार्यकर्त्याला संधी देत प्रथमेश शरद लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साळशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अधिकारी संतोषकुमार फाटक यांनी प्रथमेश लाड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
या प्रसंगी शिरगाव जि.प. गटाचे विभाग प्रमुख सुभाष नार्वेकर, साळशी येथील सुनिल गावकर, सत्यवान सावंत, किशोर साळसकर, अजय शंकरदास, राजेंद्र साटम, बंडू माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गावात युवा नेतृत्वाची निवड झाल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे, अशी अपेक्षा नव्या नेतृत्वाकडून व्यक्त होत आहे. तसेच येत्या निवडणुकांमध्ये साळशी गावातून भाजपला अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!