वेंगुर्ला येथे हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान

वेंगुर्ला येथे हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला येथे हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

जलजिवन मिशन अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील हर घर जल झालेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व गौरव करण्याकरीता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २० मार्च रोजी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

वेंगुर्ला गटाकडील हर घर जल ऑनलाईन घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत रेडी सरपंच रामसिंग राणे, आसोली-बाळा जाधव, मोचेमाड-प्रशासक, शिरोडा-लतीका रेडकर, परबवाडा- शमिका बांदेकर, पेंडुर- संतोष गावडे, म्हापण- आकांक्षा चव्हाण, परूळे- प्रणीती आंबडपालकर, कोचरा योगेश तेली-कोचरेकर इत्यादी ९ ग्रामपंचायतींच्या २१ महसुली गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना वितरीत करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरूनाथ धुरी, विस्तार अधिकारी (आरोग्य) सच्चिदानंद परब, ग्रामिण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता अनुप दळवी, बीआरसी अधिकारी द्रौपदी नाईक, कर्मचारी, सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आदी उपस्थित होते.

फोटोओळी – हर घर जल ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!