२९ डिसेंबरला नांदगाव येथे वार्षिक सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाचे आयोजन

२९ डिसेंबरला नांदगाव येथे वार्षिक सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*२९ डिसेंबरला नांदगाव येथे वार्षिक सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे “सुन्नी मेजवानी इस्लामिक वार्षिक सुन्नी इज्तेमा” या कार्यक्रमाचे रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मुस्लिम समाजाचे दाई-ए-कबीर, हजरत हाफिज वा कारी,मौलाना मुहम्मद शाकीर नूरी अमीर सुन्नी दावते इस्लामी ,आले रसूल, हजरत अलहाज सय्यद अमिनुल कादरी निग्रन, सुन्नी दावते इस्लामी, मालेगाव,बबल्स बाग मदिना, अलहाज कारी मुहम्मद रिझवान खान रुकने शूरा, सुन्नी दावते इस्लामी,जनाब अलहाज मुहम्मद सादिक रझवी रुकने शूरा, सुन्नी दावते इस्लामी हे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ वाजल्यापासून महिलांसाठी बुरखा पाळण्यात येणार असून नियाजची व्यवस्था करण्यात येणार आहे.सावंत ग्राऊंड, नांदगाव फोंडा रोड, देवगड निपाणी हायवे, नांदगाव याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण *”कोंकण एक्सप्रेस यूट्यूब चॅनलवर”* करण्यात येणार आहे.तरी मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!