सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीसाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर.

सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीसाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर.

*कोकण Express*

*सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीसाठी 14 कोटी 50 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर….*

*शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती….*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी शासनाने 14 कोटी 50 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य

लाभल्याचे केसरकर म्हणाले.

सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या इमारतीसाठी दोन कोटी रुपये मंजूर होते. मात्र तो प्रस्ताव रद्द करून शहरातील शिरोडा नाका परिसरात सध्या असणाऱ्या पंचायत समितीच्या 27 गुठे जागेमध्ये सुसज्ज इमारतीसाठी 14 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी मिळाला आहे. लवकरच सावंतवाडी तालुका पंचायत समितीचा या कामाला सुरुवात होईल असेही ते म्हणाले.

सावंतवाडी तालुका पंचायत समितीची नवीन इमारत व्हावी म्हणून काका रेगे सभापती असताना ठराव घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळामध्ये रवींद्र मडगावकर, शितल राऊळ, महेश सारंग, मनिषा धुरी, प्रमोद सावंत हे पंचायत समितीचे पदाधिकारी झाल्यानंतर त्यांनी या प्रस्तावाला चालना दिली होती. यासाठी विद्यमान गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी योग्य प्रशासकीय प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!