*कोकण Express*
*दिनांक 16 सप्टेंबर रोजी कळसुली श्री स्वामी समर्थ मठ येथे सिद्ध चरण पादुका पूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन*
श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे प्रथमच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या सिद्ध चरण पादुका पूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास करण्यात येणार आहे
सिद्ध पादुका म्हणजे अनेक दत्तक्षेत्री (अक्कलकोट, गाणगापूर, संगम, कडगंची, कमसी, कुरवपूर, पिठापूर, गिरनार, नसोऺ॑बावाडी, औदुंबर, पैजारवाडी, लाड कारंजा ) ह्या आणि अशा अनेक स्थानी विविध संस्काराने सिद्ध झालेल्या स्वामींच्या पादुकाचे आगमन श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे पूजन पाठ करून तसेच स्वामीचे नामस्मरण करुन पार पडणार आहे. तरी या मंगलमय सोहळ्या भक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रेमदया प्रतिष्ठान (रजि.) मुंबई श्री स्वामी समर्थ मठ (रजि.)कळसुली यांचे अध्यक्ष श्री हनुमंत सावंत यांनी केले आहे