महाराष्ट्र राज्य एस् .टी .महामंडळ – सिंधुदुर्ग विभागाचा बेजबाबदार कारभार

महाराष्ट्र राज्य एस् .टी .महामंडळ – सिंधुदुर्ग विभागाचा बेजबाबदार कारभार

*कोकण Express*

*महाराष्ट्र राज्य एस् .टी .महामंडळ – सिंधुदुर्ग विभागाचा बेजबाबदार कारभार*

*प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार*

*अपघात झाल्यास सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक जबाबदार राहणार*

*प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा*

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या गणपती सणासाठी सिंधुदुर्ग विभागातून मुंबईतून चाकरमान्यांसाठी आणण्यासाठी सर्व आगारातून गाड्या पाठवल्या जात आहेत . सदर गाड्यावर चालक कम वाहकाना जबरदस्ती पाठवले जात आहे, महामंडळातर्फे सदर नियत वर एकाच कर्मचाऱ्याने दोन्ही काम करण्यासाठी जबरदस्ती करून प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात आहे . 1000 km जाणे येणे एकटा कर्मच्यारी दोन्ही कामे करून मध्येच अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे, याची ताबडतोब दखल घेवून योग्य तो निर्णय विभाग नियंत्रक यांनी न घेतल्यास त्याचा जाब विचारला जाईल आणि प्रवासात घडणाऱ्या प्रसंगास विभाग नियंत्रक जबाबदार राहतील असा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!