त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी 100%निकालाची परंपरा कायम

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी 100%निकालाची परंपरा कायम

*कोकण Express*

*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी 100%निकालाची परंपरा कायम*

मार्च2023मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त परिक्षेत त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे, ता. मालवण या प्रशालेचा 100%निकाल लागला असून 100%निकालाची परंपरा कायम राखली आहे.प्रशालेतून कु. सानिका अजित घाडीगांवकर हीने मराठी विषयात 99गुणासह 87.60%गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 83.20%गुण मिळवून कु. राज उत्तम गांवकर यांने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. समृद्धी मोतीराम दुखंडे व कु. रश्मी दशरथ घाडीगांवकर यांनी 81.80गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. एकूण 13विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. 9विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर दोन विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. बाबु बाणे, उपाध्यक्ष श्री. अच्युत भावे, सरचिटणीस श्री. तुषार राऊत

कार्याध्यक्ष श्री. शंकर घाडीगांवकर खजिनदार श्री. भाऊराव घाडीगांवकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. उत्तम गांवकर, श्री. सचिन गांवकर, श्री. विजय घाडीगांवकर, श्री. पंढरीनाथ भावे, श्री. अशोक भावे, श्री. दशरथ घाडीगांवकर, श्री. दिपक चव्हाण श्री. संतोष गांवकर, मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!