सावंतवाडी शहरातील अंतर्गत रस्त्यासह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

सावंतवाडी शहरातील अंतर्गत रस्त्यासह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा

*कोकण Express*

*सावंतवाडी शहरातील अंतर्गत रस्त्यासह मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा …*

*संजू शिरोडकर, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, पालिका प्रशासनाला इशारा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शहरातील अंतर्गत रस्ते डाबरीकरण करुन सुस्थितीत करण्यात यावेत. तसेच मोकाट कुत्रे आणि डास निमुर्लन करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजू शिरोडकर यांनी सावंतवाडी पालिकेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिले असून, याबाबत तात्काळ उपाययोजना राबविण्यात यावी अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे. त्यात असे नमुद केले आहे की, शहरातील मुख्य रस्ता, खासकीलवाडा, सालईवाडा, कॉलेज, प्रांत कचेरी, भडवाडी रोड, उभा बाजार, मशीद रोड ते माठेवाडा रोड या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अर्बन बँक, न्यू सालईवाडा रोड तसेच शहरातील काही भागात नळ कनेक्शन दिलेले आहे त्या ठिकाणी देखील खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नाहीत. तरी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करून व जनतेला त्वरीत दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे शहरातील प्रचंड प्रमाणात डासाचा प्रादुर्भाव झालेला असून अद्याप पर्यंत फवारणी केलेली नसल्यामुळे शहरातील नागरिक डासांनी त्रस्त झालेले आहेत, डासांची फवारणी लवकरात लवकर करावी. शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललेला असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून देखील कुत्र्यांचा उपद्रव हा कमी झालेला दिसून येत नाही तरी याबाबत लवकरात लवकरच कारवाई करावी ज्याप्रमाणे पाणीपट्टी, घरपट्टी वसुली करता मुख्याधिकारी यांनी गाडीला बॅनर लावून वसुली करण्यात तत्परता दाखवली आहे. त्याचप्रमाणे वरील मुद्द्यांनुसार त्याचे निरसन करावे आणि जनतेचा उद्रेक होऊन त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!