*कोकण Express*
*सलून ब्युटी पार्लर असोसिएशन,मुंबई यांच्या माध्यमातून “चालक-मालक,कारागीर व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन*
*व्यावसायिकांचा शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद*
सलून ब्युटी पार्लर असोसिएशन,मुंबई यांच्या माध्यमातून “चालक-मालक,कारागीर यांना मार्गदर्शन करण्यासाठी सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र कमिटी व मुंबई कमिटी च्या पदाधिकाऱ्यांना सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता गणेश मंडळ, तानाजी नगर पोलीस चौकी जवळ मालाड पूर्व येथे आमंत्रित करण्यात आले होते”…
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रय चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.दीपक यादव,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री.किसनराव कोराळे,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री.निलेश रणदिवे,मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.तुषार चव्हाण,मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री.संदीप बदिरके,मुंबई जिल्हा सिक्रेटरी श्री.सचिन टक्के आणि मुंबई जिल्हा खजिनदार श्री. अनिल पवार हे उपस्थित होते.*
कार्यक्रमाची सुरुवात परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलनाने करून व महापुरुषांच्या पूजनाने झाली.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली ती आलेल्या लोकांच्या मनातले प्रश्न व समस्या आलेल्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्या… त्या समस्या पदाधिकार्यांनी जाणून घेऊन त्यावर उत्तर दिली आणि सर्वांचे शंकांचे निरसन केले. त्यानंतर श्री.किसनराव कोराळे साहेबांच्या भाषणांनी सुरुवात झाली ज्यामध्ये त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले… त्यानंतर श्री दत्तात्रय चव्हाण साहेब यांनी आपले म्हणणे मांडले… तसेच महाराष्ट्र अध्यक्ष श्री दीपक यादव यांनीही प्रत्येक मुद्द्याचा मुद्देसूद आढावा घेतला…
मुंबई जिल्हाध्यक्ष श्री तुषार चव्हाण यांनी लाॅकडाऊन मधील असोसिएशनच्या कार्याची काही व्हिडिओज जमलेल्या सर्व लोकांना दाखवल्या व ऐकवल्या आणि त्यांना खात्री करून दिली की लाॅकडाऊन मध्ये असोसिएशनचे लोकं ही घरात बसली नव्हती तर आपली जबाबदारी पार पाडत होती. तसेच अनुक्रमे श्री.निलेश रणदिवे श्री.सचिन टक्के श्री.संदीप बदिरके व श्री.अनिल पवार यांनी आपली बाजू सर्वांसमोर मांडली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रथमेश यांनी खूप चांगल्या प्रकारे केले.
तसेच मालाड कुराड शाखेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत ,उपाध्यक्ष श्री.अमित मोहिते ,कार्याध्यक्ष श्री.रवीलाल चव्हाण, सेक्रेटरी श्री.महेंद्र चव्हाण,खजिनदार श्री. गणेश वाघ,उपखजिनदार श्री. रोहन गायकवाड,सल्लागार श्री.निनाद चव्हाण, श्री.मंगेश पवार श्री. आत्माराम जाधव,श्री.राजेंद्र गायकवाड, श्री.सुधाकर कशेळकर व हिशोब तपासणी श्री.कपिल देव शर्मा आणि विभाग अध्यक्ष श्री.रामाश्रेय शर्मा,श्री.संजय शर्मा,श्री.निरुद्दीन शेख तसेच सदस्य श्री.सतिश गगाधरे श्री.बाबूलाल शर्मा,श्री.सुंदर शर्मा,श्री.मंजूर अली यां सर्वांनी दिवस-रात्र मेहनत करून या कार्यक्रमाची रूपरेषा खूपच चांगल्या प्रकारे आखली होती… त्यामुळे सर्व व्यावसायिक कार्यक्रमाला हजर होते.
यावेळी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तसेच स्थानिक कमिटीचे पदाधिकारी यांचेही सत्कार मान्यवरांनी केले आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यांच्या पदाचे निवड पत्रक देऊन त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

