*कोकण Express*
*करंजे येथे एस .टी . बस फेऱ्यांचा अनियमितपणा*
*विद्यार्थ्यांना बसतोय नाहक फटका,ग्रामस्थही नाराज*
*कासार्डे:संजय भोसले*
करंजे येथे आदर्श विद्यालयात कणकवली , हरकूळ , करंजे , नागवे या पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच करंजे व नागवे गावातील बरेच विद्यार्थी कणकवली महाविद्यालयांत शिकत असून बर्याच ग्रामस्थांची कामानिमित्ताने कणकवलीला सतत ये जा असते परंतु हल्ली कणकवली एस.टी . डेपोतून करंजेकडे येणाऱ्या बस फेऱ्या मध्ये सातत्याने अनियमितता दिसून येत असून केव्हा केव्हा बस फेऱ्या अचानक बंद केल्या जातात यामूळे करंजे पंचक्रोशीतील विद्यार्थी , ग्रामस्त यांचे ऐन पावसाळ्याच्या दिवसात अतोनात हाल होत आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . त्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करून आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत करंजे , नागवे गावातील सरपंच व कार्यकर्ते , शिक्षक यांनी संबधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यास गाड्यांचा तुटवडा असल्याचे सांगून असमाधानकारक उत्तरे मिळत आहेत . त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे . त्यामुळे ग्रामस्थांचे होणारे हाल व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गाड्या वेळेत सोडण्याची मागणी ग्रामस्थांन कडून होत आहे.

