फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी

फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी

*कोकण Express*

*फोंडाघाट- नवीन कुर्ली येथे “गुरुपौर्णिमा” उत्साहात साजरी*

“परमपूज्य सदगुरु भोसले महाराज” यांनी अनुग्रह दिलेल्या फोंडा पंचक्रोशीतील त्यांच्या सर्व शिष्यगण यांनी आज नवीन कुर्ली याठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी केली.

आपल्या जीवनात ज्या सद्गुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले असे सदगुरु भोसले महाराज यांचे पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्याप्रसंगी त्यांचे शिष्यगण मा. जि. प. सदस्य संजय आग्रे, संतोष टक्के, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, अमित दळवी, कृष्णा परब, शिवराम पोवार, आनंद सावंत, प्रकाश दळवी, महादेव ऐंडे, नंदकिशोर रावराणे, मधुकर परब तसेच मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!