पर्यावरण पुरक गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धा मूर्तीकारांच्या विनंती नंतर पुढे ढकलण्यात आली आहे

पर्यावरण पुरक गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धा मूर्तीकारांच्या विनंती नंतर पुढे ढकलण्यात आली आहे

*कोकण Express*

*पर्यावरण पुरक गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धा मूर्तीकारांच्या विनंती नंतर पुढे ढकलण्यात आली आहे*

*पुढील तारिख लवकरच जाहीर करणार तर माजगांव येथे १६जुलैला जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी गणेश मूर्ती रंगकाम व रेखणी कार्यशाळा व प्रात्यशिक*

*सिंधुदुर्गनगरी- (प्रतिनिधी)*

सिंधुदुर्ग जिल्हा बँक,श्री गणेश मूर्तीकार संघ सिंधुदुर्गव भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी २०२२ साठी जिल्हास्तरीय पर्यावरणपुरक गणेश मूर्तीचे आयोजन कुडाळ येथे १५ते १७जुलै २०२२दरम्यान आयोजीत करण्यात आली होती ती मूर्तीकारांच्या विनंती नंतर पुढे ढकलण्यात आली असुन स्पर्धेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान १६जुलै २०२२ रोजी माजगांव येथील सिध्दीविनायक हॉल मध्ये दुपारी २.३०ते ५.३०या वेळेत गणेशमूर्ती रंगकाम व रेखणी कार्यशाळा व प्रात्यशिकाचे आयोजन जिल्ह्यातील मूर्तीकारां साठी करण्यात आले आहे. मंगलमूर्ती गणेशामध्ये रंगसंगती व रेखणी यांचे महत्व आहे. पर्यावरणपूरक रंग हि काळाची गरज आहे.या संबधीचे मार्गदर्शन व प्रत्यशिक कँमल कंपनीच्या मार्गदर्शना खाली होणार आहे.या मार्गदर्शन कार्येक्रमास जिल्ह्यातील सर्व मूर्तीतकार बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिलेहा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकरयांनी केले आहे सदर कार्यशाळेचे आयोजन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व कँमल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.या कार्यशाळा संपर्कसाठी नविन मालवणकर मोबा.नं.८८०६३४५४८८ असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!