तळेरे येथे मधुसुदन नानीवडेकर यांच्या प्रथम स्मुर्ती दिनी केला आठवणींचा जागर

तळेरे येथे मधुसुदन नानीवडेकर यांच्या प्रथम स्मुर्ती दिनी केला आठवणींचा जागर

*कोकण Express*

*तळेरे येथे मधुसुदन नानीवडेकर यांच्या प्रथम स्मुर्ती दिनी केला आठवणींचा जागर*

*कासार्डे:संजय भोसले*

सुप्रसिद्ध गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी तळेरे येथे नानिवडेकरांच्या स्मृतींचा जागर करण्यात आला.स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे या संस्थेकडून नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वाचनालय सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्व मधूसुदन नानीवडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार सागर पावसकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर, उपाध्यक्ष नारायण वळंजू, सुरेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, माजी उपसरपंच दीपक नांदलस्कर, अशोक मुद्राळे, प्रमोद कोयंडे, विश्रांती कोयंडे, नांदलस्कर, सतीश मदभावे आदी उपस्थित होते.

नानिवडेकरांच्या स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी त्यांच्या नावाने वाचनालयाने साहित्यक्षेत्रासाठी एखादा पुरस्कार सुरू करावा, अशी सूचना लेखक-कवी प्रमोद कोयंडे यांनी केली. त्या सूचनेला संस्थापक अध्यक्ष दादा वरुणकर यांनी अनुमोदन देत लवकरच याबाबत विचारविनिमय करू, असे सांगितले.

यावेळी दादा वरुणकर, शशांक तळेकर, चंद्रकांत तळेकर, विनय पावसकर यांनी आपल्या मनोगतातून नानिवडेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!