*कोकण Express*
*तळेरे येथील सर्पमित्र मारूती वळंजू यांना पितृ शोक*
*कासार्डे:संजय भोसले*
तळेरे वाघाचीवाडी येथील आत्माराम कृष्णा वळंजू, वय 95 वर्षे यांचे मुंबई येथे सोमवारी पहाटे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दादा या नावाने सुपरिचित असलेले वळंजू वारकरी संप्रदायातील होते. अलिकडेच ते मुंबई येथे गेले होते. तळेरे येथील सर्पमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती वळंजू यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

