*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील माध्यमिक मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न. विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा*
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे मा. शिक्षणाधिकारी डॉ.श्री. मुश्ताक शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न झाली. या सभेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 210माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सदर सभेत शालेय प्रशासन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, सह शालेय उपक्रम,शिष्यवृती योजना,या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात
आले आणि चर्चा करण्यात आली. मा. शिक्षणाधिकारी श्री. मुश्ताक शेख यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती,पवित्र पोर्टल,अभियोग्यता चाचणी,अनुकंपा धोरण,न्यायालयीन प्रकरणे, महिला तक्रार निवारण समिती,राज्य पुरस्कार प्रस्ताव,इन्सपायर्ड अवॉर्ड,बालचित्रकला स्पर्धा,शाळासिद्धी,शिष्यवृत्ती,वेतनेतर अनुदान,शिपाई नियुक्ती,चित्रकला परीक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि मुख्याध्यापकांच्या समस्या समाजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या सहविचार सभेत श्री. गायकवाड, स्काऊट-गाईड जिल्हा संघटक यांनी स्काऊट-गाईड चळवळीबाबत माहिती दिली आणि या विषयाचे महत्त्व स्पष्ट करुन विद्यार्थ्यांना कोणते फायदे होतात ते विशद केले. मा. श्री. म्हालटकर साहेब, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा सचिव यांनी शालेय जीवनात मुलांकडून होणारे विविध गुन्हे, त्यांना विविध कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षा, शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यायची काळजी याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन केले. श्री. एकनाथ गावडे, ग्राहक मंच उपाध्यक्ष यांनी माध्यमिक स्तरावरील मुलां-मुलींच्या समस्याबांबत मार्गदर्शन केले. तसेच त्या सोडविण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. मा. श्री. शेर्लेकर साहेब, उप शिक्षणाधिकारी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शाळा स्तर राबवायच्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. डायट प्राचार्या श्री. तावशीकर मॅडम यांनी शाळा बाह्य मुले शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच डायट मार्फत विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्या विद्यांजली 2.0पोर्टल बाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस मॅडम यांनी क्रिडा विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन विविध स्पर्धा बाबत माहिती दिली. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे यांनी शालेय प्रशासन चालवताना शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापकांना कोणकोणत्या
जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन नवीन मुख्याध्यापकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले. तसेच शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सहशालेय उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम याबाबत माहिती दिली. शालेय रेकॉर्ड बाबत माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाळांचे प्रश्न मांडले आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरती सबंधित शासनाने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांना घेऊन तीव्र आंदोलन करुया असे आवाहन उपस्थित मुख्याध्यापकांना केले..
या सहविचार सभेसाठी कणकवली गटशिक्षणाधिकारी श्री. गवस साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर मॅडम, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. हनुमंत वाळके,सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर, सहसचिव श्री. धनाजी पाटील विद्या समिती सचिव श्री. विवेकानंद बालम, मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने इयत्ता बारावी, दहावी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री.गुरुदास कुसगांवकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष श्री. वाळके सर यांनी केले तर आभार कणकवली तालुका सचिव श्री. शरद चोडणकर सर यांनी मानले

