*कोकण Express*
*शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दि.14 जुलै 2022 रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन*
शिवसेना नेते तथा कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.14 जुलै 2022 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी 8:30 वाजता कै.सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तसेच सकाळी 10:30 वाजता गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. त्यानंतर 11:00 वाजता उपस्थितीत मान्यवरांच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत, माजी केंद्रीयमंत्री अँड.रमाकांत खलप, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते श्री.गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभव नाईक, माजी राज्यमंत्री श्री. प्रविण भोसले, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख आप्प्पा पराडकर, शिवसेना नेते बाळा भिसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला संघटनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि संदेश पारकर प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कणकवली शहरप्रमुख शेखर राणे यांनी केले आहे.

