*कोकण Express*
*तळेरे येथे एकादशीनिमित्त संतांची मांदीयाळी*
*अंगणवाडितील मुलांनी साकारल्या वेशभूषा आणि घातला हरिनामाचा गजर*
*कासार्डे:संजय भोसले*
तळेरे येथील अंगणवाडी ग्रामपंचायत क्रमांक 4 मधिल चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्त विविध संतांच्या वेशभूषा करीत हरिनामाचा गजर घातला. यावेळी मुलांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अंगणवाडीतील मुलांनी ग्रामपंचायत परिसरात दिंडी काढली. रिंगण सोहळा खेळला. हरिनामाचा गजर करीत दिंडी फिरली. यावेळी मुलांचे पालकही उपस्थीत होते. यासाठी अंगणवाडी सेविका नेहा वायंगणकर, मदतनीस मानसी तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आषाढी एकादशीचा पुरेपुर आनंद या मुलांनी अनुभवला.

