अवघा कनेडी परिसर झाला विठ्ठलमय

अवघा कनेडी परिसर झाला विठ्ठलमय

*कोकण Express*

*अवघा कनेडी परिसर झाला विठ्ठलमय*

*आषाढी एकादशीच्या निमित्ताने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने आज “एक दिवस वारकर्‍यांसाठी या संकल्पनेतून “कीर्तन पांडुरंगाचे” हा कार्यक्रम संपन्न*

आषाढी एकादशीच्या निमित्ताने युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने आज रविवार दिनांक १० जुलै २०२२ कनेडी बाजारपेठ,सांगवे येथे *एक दिवस वारकर्‍यांसाठी* या संकल्पनेतून

*कीर्तन पांडुरंगाचे* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात

*ह.भ. प श्री प्रसाद व्यास,पुणे* व *ह.भ. प.सौ. उज्वला ताई वेदपाठक,पुणे* यांची सुश्राव्य किर्तने सादर झाली. त्याच प्रमाणे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने

*पांडुरंगाची दिंडी* काढण्यात आली यातील लहान मुलांनी सादर केलेले चित्रदेखावे पाहण्यासारखे होते. स्थानिक वारकर्‍यांनी *हरिपाठ* सादर केला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून गेला होता. स्थानिक लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. अवघी पंढरी अवतरल्याचा भास क्षणोक्षणी होत होता. ज्या वारकरी मंडळींना ईच्छा असूनही पंढरपूरला जाता आले नाही त्यांच्यासाठी सावंत दांपत्यांने अक्षरशः पंढरपुर कनेडीला आणल्याच्या भावना उपस्थित वारकरी मंडळीच्या तोंडी होती. यावेळी वृद्ध व महीलांची उपस्थिति लक्षणीय होती.

यावेळी आयोजक/ निमंत्रक

*मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत* व *मा सौ संजना संदेश सावंत* माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग .,जातीनिशी प्रत्येक वारकरी मंडळींकडे लक्ष देत होते,. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल स्थानिक विरारी व जेष्ठ नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!