कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणाऱ्यांना मालवण पोलिसांचा दणका ; चार जणांवर कारवाई

कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणाऱ्यांना मालवण पोलिसांचा दणका ; चार जणांवर कारवाई

*कोकण Express*

*कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणाऱ्यांना मालवण पोलिसांचा दणका ; चार जणांवर कारवाई*

*मालवण : प्रतिनीधी*

बुलेटच्या सायलेन्सर सिस्टीममध्ये बदल करून मोठ्या कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणे, तसेच नियमांचे उल्लंघन प्रकरणी चार बुलेट स्वारांवर मालवण पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांनुसार वाहन न चालवणाऱ्यांवर कारवाई सुरूच रहाणार असल्याचे मालवण पोलिसानी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून मालवण शहर परिसरात कर्णकर्कश आवाजासह रात्री उशीराही बुलेटस्वार वेगात फिरत असतात. अश्या तक्रारी मालवण पोलिसांकडे येत होत्या. तरी वरील प्रकारे बुलेट चालवताना दिसून आल्यास कारवाई केली जाईल. असा इशारा मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी यापूर्वीच दिला होता.त्यानुसारच मालवण पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब व पथकाने चार बुलेट स्वारांवर ४ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!