*कोकण Express*
*कणकवली शहरालगतच्या क्लब मध्ये राडा?*
*पोलिसांनी टाकलेल्या छाप्याची “टीप” दिलेल्या संशयावरून क्लब चालकासह सहकाऱ्यांना दिला चोप माार*
*कणकवली: प्रतिनीधी*
चार दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्याची टीप कणकवली शहारा लगत एका गावामध्ये असलेल्या क्लब चालक व त्याच्या सहकाऱ्याने दिल्याच्या संशयावरून कासार्डेतील पोलीस कारवाईत भाजलेल्या काहींनी आज शहरालगतच्या त्या क्लब मध्ये येत काहींना भरपेट प्रसाद दिल्याचे समजते. यात काहींच्या डोळ्याला ही दुखापत झाल्याचे कळते. यावेळी त्या क्लब मध्ये काही प्रमाणात मोडतोडही झाल्याचे समजते. मात्र या संपूर्ण प्रकरणाची पोलिसात कोणतीही नोंद नाही. दरम्यान कासार्डे मध्ये पोलिसांनी कारवाई करताना सापळा रचून छापा टाकला. एवढी इत्यंभूत माहिती कदाचित त्या क्लब मधीलच काहींनी दिल्याचा संशय आल्याने त्या संशयातून हा हाणामारीचा प्रकार घडला असे समजते. मात्र कणकवली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या क्लब मध्ये खुलेआम प्रकार घडून देखील क्लबच्या नावाखाली चालत असलेला जुगार बंद करण्यासाठी पोलीस पुढाकार घेतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

