*कोकण Express*
*नांदगाव येथे वादळग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीने पत्रे व कौले वाटप*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील खालची मुस्लिम वाडी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले होते. यात कित्येक घरांना फटका बसला होता. राहत्या घरांचे छप्पर उडून नुकसान झाले असून यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्या वतीने व राजा नावलेकर यांच्या प्रयत्नाने मोफत सिमेंट पत्रे व कौले वाटप करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मजिद बटवाले, भाई तोरसकर, राजा नावलेकर, समिर नावलेकर, नवाज पाटणकर, बाळा सातोसे, अमिन नावलेकर, शब्बीर साटविलकर आदी उपस्थित होते.

