*कोकण Express*
*कृषि सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीपाद चव्हाण यांची निवड*
*सिंधुदुर्ग :*
महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा सिंधुदुर्गची जिल्हास्तरीय त्रैवार्षिक निवडणूक शनिवारी 12 मार्चला राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था ओरोस बिनविरोध पार पडली. यात जिल्हाध्यक्षपदी कुडाळातील कृषि सहाय्यक श्रीपाद चव्हाण यांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर राज्य कार्यकारीणी सदस्यपदी सुष्मा देसाई, कृषि सहाय्यक, तालुका सावंतवाडी, कार्याध्यक्ष पदी चंद्रशेखर कदम , कृषि सहाय्यक , तालुका कणकवली, उपाध्यक्ष पदी गणेश राठोड कृषि सहाय्यक , तालुका देवगड , आणि श्री. लाडू जाधव , कृषि सहाय्यक , तालुका वेंगुर्ला, सचिव पदी अमृता राणे , कृषि सहाय्यक , तालुका मालवण, खजिनदार पदी बालाजी वाघमोडे , कृषि सहाय्यक , तालुका वैभववाडी, प्रसिद्धी प्रमूखपदी पूनम कोलते , कृषि सहाय्यक , माती परीक्षण प्रयोगशाळा , ओरोस, महिला प्रतिनिधी पदी साक्षी बांदेकर , कृषि सहाय्यक , तालुका सावंतवाडी संघटक पदी उमेश राणे , कृषि सहाय्यक , तालूका कणकवली आणि सूशील शिंदे , कृषि सहाय्यक , तालुका , मालवण याप्रमाणे निवड झाली.
जिल्हास्तरीय कार्यकारीणी निवडीच्यावेळी सर्व तालु काध्यक्ष निवडणूक प्रक्रीयेसाठी उपस्थित होते. चिपळूण येथील दादासो खारतोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज केले व निवडणूक प्रक्रीया राबविली.

