*कोकण Express*
*कणकवली महाविद्यालयाच्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर*
*वरिष्ठ गटात दिव्या राणे, नंदिनी कोरगावकर तर कनिष्ठ गटात निर्जरा पाटील प्रथम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली महाविद्यालयातील इतिहास विभागाने भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निकाल खालीलप्रमाणे आहे. स्पर्धेत कनिष्ठ विभागात २८ तर वरिष्ठ विभागात ४८ विद्यार्थ्यांनी आपले निबंध पाठवले होते. परीक्षकांनी दिलेला अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.
कनिष्ठ विभाग- प्रथम निर्जरा संजय पाटील, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ, द्वितीय माधवी लीलाधर तिरोडकर, सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यामंदिर,मालवण व राजन रत्नाकर सावंत, कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय निहाल सलीम शेख, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट व प्रतीक्षा सुहास रावराणे,कै. हेमंत केशव कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी, उत्तेजनार्थ संगमित्रा मोहन किर्ते, कै.सौ.इंगेटॢटाऊट नाईक अध्यापक विद्यालय कणकवली, पल्लवी परशुराम खरुडे, श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी, ओंकार प्रकाश घोगळे, कणकवली कॉलेज कणकवली.
वरिष्ठ विभागामध्ये प्रथम दिव्या विजय राणे व नंदिनी सिताराम कोरगावकर, कणकवली कॉलेज कणकवली आणि
सोनिया तुकाराम जाधव श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, द्वितीय ऋतुजा दत्तात्रय जडये, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, वर्षा रत्नाकर पाताडे, कणकवली कॉलेज कणकवली, तृतीय प्रेरणा घन:श्याम खरुडे, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, चैताली चंदू पाटकर,श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी व संजना भिमराव प्रभावळकर,कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट , उत्तेजनार्थ अपर्णा बाळकृष्ण गावकर, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट, भक्ती चंद्रकांत काणकेकर, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी, तनिषा श्रीधर बाणावलकर, कणकवली कॉलेज कणकवली, साक्षी राजेश आचरेकर, कणकवली कॉलेज कणकवली.
या निंबध परीक्षक म्हणून प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. दिपा तेंडोलकर व प्रा.कु. नम्रता पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना लवकरच कणकवली महाविद्यालयात आयोजित प्रत्यक्ष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ स्वरुपात पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील व संबंधितांना तसे कळविण्यात येईल असे प्राचार्य डाॅ. राजेंद्रकुमार चौगुले, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, डॉ. मारोती चव्हाण,प्रा.प्रियंका पाटील यांनी सांगितले.

