*कोकण Express*
*देवधर प्रकल्पा अंतर्गत फोंडाघाट येथील उर्वरित कालव्याच्या अडी अडचणी संदर्भात बैठक संपन्न*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
देवधर प्रकल्पा अंतर्गत फोंडाघाट येथील उर्वरित कालव्याच्या अडी अडचणी संदर्भात बैठक रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे सन्मा. खासदार विनायकजी राऊत साहेब व सबंधित खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज फोंडा बाईचे भाटले येथे पार पाडली. यावेळी प्रांत कणकवली वैषाली राजमाने, तहसीलदार आर.जे. पवार, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जि. प. सदस्य संजय आंग्रे, विभागप्रमुख बाबू राणे, संदेश पटेल, आबु पटेल, चेअरमन सुभाष सावंत, राजू पटेल, राजन नानचे, पिंटू पटेल, रंजन चिके, राजू राणे, शाखाप्रमुख विजय मराठे, कृष्णा एकावडे, सुरेश टकके उदय वामन राणे, प्रकाश हिर्लेकर, प्रसाद राणे, राजू शिरोडकर, श्याम भूवड , तलाठी, प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन खासदार साहेब यांनी दिले. लवकरात लवकर मोबदल्याची रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात कालव्याचे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


