बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा दावे व हरकती दाखल करण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा दावे व हरकती दाखल करण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

*कोंकण एक्सप्रेस

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा

*दावे व हरकती दाखल करण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

*सिंधुदुर्गनगरी

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली असून सुधारित वेळापत्रक निर्गमित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार हे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार आता मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे. प्राप्त झालेले दावे व हरकती निकालात काढणे तसेच नोटीस टप्प्यासाठी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार पुढील सर्व कामकाजाचे नियोजन करतील. प्राप्त झालेले दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या आहेत. तालुका व मतदारसंघ स्तरावर सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना या सुधारित वेळापत्रकाबाबत लेखी पत्राद्वारे तात्काळ अवगत करण्यात आले आहे.

दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित कालावधीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →