बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार

📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 ५ब्रेकिंग
नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार

*कोंकण एक्सप्रेस

*नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार;

*राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!

*'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियान

*नागपूर

भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आपल्या एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्राची एकता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांना बाधा पोहोचविण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत आहेत. ही लढाई केवळ विचारांची नसून देशाची एकता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची आहे.

देशात ‘जय श्रीराम’ म्हणण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक आहे. आपण जागरूक राहिलो नाही, तर भविष्यात आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा येऊ शकते. त्यामुळे आपल्या धर्माचे, संस्कृतीचे आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी संघटित, सक्षम आणि जागरूक राहावे. राष्ट्रहित आणि धर्मरक्षणासाठी युवकांनी सकारात्मक भूमिका बजावत समाजात एकजुटीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.

या कार्यक्रमास आमदार परिणय फुके, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, नागपूरच्या महापौर सौ. ठाकरे, आमदार खोपडे, विदर्भ संघटन प्रमुख कोठेकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, आमदार पोतदार, स्थायी समिती अध्यक्ष सौ. शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, रिषभ अरखेल, कुलदीप माटे, संपर्क महामंत्री नागेश साठवणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →