बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

📅 २७ ऑक्टोबर, २०२६👁 २१ब्रेकिंग#zpsindhudurg
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस

*सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी २ नवीन घंटागाड्या दाखल

*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण

*सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता व्यवस्थापन अधिक गतिमान, शिस्तबद्ध व प्रभावी करण्यासाठी प्राधिकरणाकडून २ नवीन अद्ययावत घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण तृप्ती धोडमिसे अध्यक्ष, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार चैताली सावंत उपस्थित होते.

प्राधिकरण क्षेत्रात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वेळेत, नियमित व शास्त्रोक्त पद्धतीने संकलन करता यावे, या मुख्य उद्देशाने या घंटागाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत आहेत. या नवीन घंटागाड्यांमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष / सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांकडून कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण करून तो संकलित करणे शक्य होणार आहे.

प्राधिकरण क्षेत्रातील सर्व नागरिक, व्यावसायिक व आस्थापनांकडून दररोजचा कचरा गोळा करणे अधिक सोपे, सुटसुटीत व प्रभावी होईल. दररोज संकलित केलेला ओला व सुका कचरा थेट कचरा डेपोपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे शक्य होणार आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लागल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गनगरी परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यास मोठी मदत होईल.

प्राधिकरण मधील सर्व नागरिकांना आपल्या घरातील व दुकानातील ओला व सुका कचरा नेहमी वेगळा ठेवूनच घंटागाडीत द्यावा आणि प्राधिकरण परिसर स्वच्छ राखण्यास सक्रिय सहभाग नोंदवून सिंधुदुर्गनगरी स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती तृप्ती धोडमिसे (मा. अध्यक्ष, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग) यांनी केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →