बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली

कागदपत्रांच्या हार्ड कॉपी जमा करण्याची गरज नाही

📅 २२ ऑक्टोबर, २०२६👁 ४२ब्रेकिंग#zpsindhudurg
जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली

*कोंकण एक्सप्रेस

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी नवीन ऑनलाइन प्रणाली;

*कागदपत्रांच्या हार्ड कॉपी जमा करण्याची गरज नाही

*सिंधुदुर्गनगरी

जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि पूर्णतः ऑनलाइन करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार विकसित करण्यात आलेली नवीन संगणकीय प्रणाली दि. 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्जाची किंवा जोडलेल्या कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

नवीन प्रणालीसाठी https://cvc.barti.in/home हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवरून अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज सादर केल्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंत अर्जाची सद्यस्थिती कोणत्या टप्प्यावर आहे, याचे ऑनलाइन ट्रॅकिंगही करता येणार आहे.

अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला काही शंका असल्यास संबंधित अर्जदाराशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यात येईल. या माध्यमातून ऑनलाइन चर्चा व सुनावणी घेऊन अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सादर केलेले पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीकडून गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येईल.

नवीन प्रणाली पूर्णतः ऑनलाइन असल्यामुळे अर्जासंदर्भात नियमित कामकाजासाठी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. अर्ज प्रक्रियेबाबत माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास बार्टी मुख्यालय, पुणे येथील मदतकक्षाशी संपर्क साधावा. यासाठी दूरध्वनी क्रमांक 020-26333339, व्हॉट्सॲप क्रमांक 9404999452 किंवा helpdesk@barti.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष उपेंद्र तामोरे, उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव तुषार गवळी यांनी केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →