*कोकण Express*
*पोलीस कर्मचारी संदीप राठोड यांच्या धाडसी शौर्याला सलाम – नासीर काझी*
*वैभववाडी भाजपच्या वतीने सत्कार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जखमी ट्रक चालकाला दरीतून बाहेर काढत त्याच्यासाठी देवदूत बनून धावून आलेल्या वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. संदीप राठोड यांनी दाखवलेल्या शौर्याला तमाम वैभववाडीवासीयांकडून सलाम. अशा शब्दात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी राठोड यांचे कौतुक केले. या सत्कार प्रसंगी वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पं. स. सभापती अक्षता डाफळे, पं.स. सदस्य अरविंद रावराणे, शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, प्रदीप नारकर, सुनील भोगले, अनंत फडके आदी उपस्थित होते. रविवारी करूळ घाटात ट्रकचा अपघात झाला होता. ट्रक 600 फूट दरीत कोसळला होता. चालक श्रीमंत बिकट हा गंभीर अवस्थेत दरीत पाडला होता. पोलीस राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचत चालक यांच्या अंगावरील दगड बाजूला करत चालकाला इतर दोघांच्या साह्याने दरीतून बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले होते. त्याला वेळीच बाहेर काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. पोलीस राठोड यांच्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो – वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी. सोबत उपस्थित पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सभापती अक्षता डाफळे, अरविंद रावराणे, प्रकाश पाटील, प्रदीप नारकर, सुनील भोगले व आनंद फोंडके.