शिरवल गावात घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप

शिरवल गावात घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप

*शिरवल गावात घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप ः संदीप चौकेकर मित्रमंडळाचा कौतुकास्पद उपक्रम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

“माझा गाव माझी जबाबदारी “या ऊक्तीप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळात गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी धाऊन येत शिरवल गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक संदीप चौकेकर यांनी संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून शिरवल गावात घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप केले. तसेच दुर्गामातेचे विसर्जन केल्यावर गावात घरोघरी दुर्गामातेचा प्रसाद म्हणुन संदिप चौकेकर मित्रमंडळाकडुन लाडु वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे शिरवल गावातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिरवल येथे नुकतेच घरोघरी वाफेच्या मशिनचेे वाटप करण्यात आले.यावेळी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण यादव, माजी सरपंच मनोज राणे, प्रदीप चौकेकर, रामचंद्र गोळवणकर, तेजस चौकेकर, किरण चौकेकर, साईल गावडे, शाहील गावडे, प्रदीप तेंडुलकर, किरण चौकेकर, राहुल चौकेकर, प्रसाद मेथर आदी उपस्थित होते. उद्योजक संदीप चौकेेेकर यांनी कोरोनाच्या संकटकाळात देखील गावातील सर्व लोकांना अन्न धान्य वाटप केले. तसेच शिरवल येथे महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात “नो वेदना जेल एलमेंडस मेडिसिनचे” वाटप केले होते. त्यावेळी २०० महिलांनी मेडिसिनचा लाभ घेतला आहे .शिरवल गावात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात उद्योजक संदिप चौकेकर नेहमीच योगदान देत असून सामाजिक बांधिलकी जोपासताना समाजसेवेचे व्रत घेतलेल्या संदीप चौकेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जोपासताना शिरवल गावासह कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वाटप करुन लोकांना मदतीचा हात दिला आहे.सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कुटुंबातील लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. शिरवलचे गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक संदिप चौकेकर यांनी आपल्या दातृत्वातून आणि कर्तृत्वातून केलेल्या सामाजिक कार्यातून आपल्या शिरवल गावाशी आणि कणकवली तालुक्याशी नाळ जोडली आहे.म्हणूनच त्यांच्या परोपकारी आणि दातृत्वाच्या गुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईत उद्योगजगतात नावलौकिक कमावलेल्या मूळ शिरवल गावचे सुपुत्र असलेल्या संदीप चौकेकर यांनी आपल्या गावाशी नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. शिरवल पंचक्रोशीतील शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात चौकेकर यांचे नेहमीच भरीव योगदान असते.आपल्या दातृत्वाने दानशूर व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खेडेगावात बालपण गेलेल्या चौकेकर यांना ग्रामीण भागातील व्यथांची जाण आहे. त्यामुळेच प्राधान्याने कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबाना त्यांनी मदतीचा हात दिला असून उद्योजक संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाबद्दल ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!