मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ नौटंकी; आ.नितेश राणे

मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ नौटंकी; आ.नितेश राणे

*कोकण  Express*

*सर्वाधिक नुकसान होवूनही देवगड, वैभववाडीत मुख्यमंत्री नाहीत*

*मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ नौटंकी; आ.नितेश राणे*

*कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा मुख्यमंत्र्यांचा दौरा!*

*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*

सिंधुदुर्गात सर्वाधिक नुकसान झाले देवगड आणि वैभववाडी तालुक्यात. विधानसभा निवडणुकीत 56 हजार मते शिवसेनेला कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात मिळाली. मात्र 3 तासांसाठी पर्यटक म्हणून आलेल्या मुख्यमंत्र्यांना 56 हजार मते देणाऱ्या देवगड आणि वैभववाडी तालुक्यात जावेसे वाटले नाही. तेथील मच्छीमार, आंबा बागायतदारांचे अश्रू पुसावेसे वाटले नाहीत. हा 56 हजार मतदारांचा मुख्यमंत्र्यांनी केलेला अपमान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देवगडमधील मच्छीमारांची व्यथा समजून घेतली. नुकसान झालेल्या, तुटलेल्या हापूस कलम बाग पायाखाली घालून जातिनिशी नुकसानीची पाहणी केली. आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना धीर दिला. शिवसेनेला यापूढे मते मागण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल करतानाच कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मतदारांनीच यापूढे सेनेला मतदान करायचे की नाही हे ठरवावे असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!