नशा मुक्त भारत अभियानांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एनएमबीए पोर्टलवर नशामुक्त मित्र नोंदणी व शपथ घेण्याचे आवाहन

नशा मुक्त भारत अभियानांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एनएमबीए पोर्टलवर नशामुक्त मित्र नोंदणी व शपथ घेण्याचे आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*नशा मुक्त भारत अभियानांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एनएमबीए पोर्टलवर नशामुक्त मित्र नोंदणी व शपथ घेण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी*
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील राष्ट्रीय ई शपथ घेण्यात येणार आहे.
देशातील तरुणांमध्ये तसेच समाजात अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती निर्माण करणे, व्यसनमुक्त समाज घडविणे आणि नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी NMBA पोर्टलवर ‘नशा मुक्त मित्र’ म्हणून नोंदणी करावी तसेच ‘National Pledge Against Drug Abuse’ ही e-Pledge घ्यावी. अमली पदार्थांच्या व्यसनासंदर्भात मार्गदर्शन व मदतीसाठी 14446 हेल्पलाईनचा वापर करावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी व युवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!