आवास योजनेतील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत पूर्ण करण्याचे निर्देश

आवास योजनेतील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत पूर्ण करण्याचे निर्देश

*कोंकण एक्सप्रेस*

*आवास योजनेतील कायमस्वरूपी प्रतिक्षा यादी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत पूर्ण करण्याचे निर्देश*
*सिंधुदुर्गनगरी*
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 मधील स्वयं-सर्वेक्षण प्रकरणांचे नियुक्त सर्वेक्षकांमार्फत पुष्टीकरण तसेच तपासणीस मार्फत फ्लॅग्ड प्रकरणांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या अपात्र कुटुंबांना वगळण्यासाठी (डिलेशन मॉड्यूल) आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मसुदा कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (ड्राफ्ट पीडब्लूएल ) अंतिम करण्यासाठी दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ग्रामसभेची मान्यता घेऊन संपूर्ण प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली.
शासन निर्देशानुसार दिनांक १५.०८.२०२६ रोजी ग्रामसभेचे आयोजन करणे अभिप्रेत असून सभेच्या अजेंड्यामध्ये कायमस्वरुपी प्रतीक्षा यादी (PWL) करण्याचा विषय समाविष्ट करावा. मसुदा प्रतिक्षा यादी ग्रामसभेसमोर सादर करून लाभार्थ्यांच्या पात्रतेची फॅक्टबेसड पडताळणी करावी. ग्रामसभेने सुचविलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये (Beneficiary Facts) सर्व शिफारशी व बदलांची आवश्यक सुधारणा करावी. ग्रामसभा बैठकीचे Geo-tagged व वेळ-नोंद (Timestamp) असलेले ३ स्वतंत्र छायाचित्रे अपलोड करावी. ग्रामसभाकार्यवाहीचा नमुना (Proceeding Template) प्रणालीद्वारे स्वयंचलित तयार होणार असून त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्या स्वाक्षऱ्या व अधिकृत शिक्का घेवून पुनश्चः अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!