आसोली गावच्या उपसरपंचा सौ.शितल घाडी यांचा भाजपाकडून सत्कार

आसोली गावच्या उपसरपंचा सौ.शितल घाडी यांचा भाजपाकडून सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*आसोली गावच्या उपसरपंचा सौ.शितल घाडी यांचा भाजपाकडून सत्कार*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

आसोली गावच्या उपसरपंच पदी सौ.शितल घाडी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व मंडल अध्यक्ष पपु परब यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
उपसरपंच पदी असलेले संकेत धुरी यांची पंचायत समिती सदस्य म्हणुन निवड झाल्यामुळे उपसरपंच पदाची निवडणुक घ्यावी लागली . आसोली ग्रामपंचायत मध्ये भाजपाची एकहाती सत्ता असल्याने उपसरपंच निवड बिनविरोध झाली .
या सत्कार प्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , पंचायत समिती सदस्य संकेत धुरी , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस वसंत तांडेल , युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर , किसान मोर्चाचे संदिप देसाई , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , ग्रामपंचायत सदस्य नेत्रा राणे , प्रशांत घाडी , बाबु घाडी व कुटुंबीयांसह कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!