जलसंधारण सप्ताह अंतर्गत 21 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ’महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन

जलसंधारण सप्ताह अंतर्गत 21 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ’महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*जलसंधारण सप्ताह अंतर्गत 21 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ’महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन*
*उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*
*सिंधुदुर्गनगरी*

शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चे पोलीस परेड ग्राऊड येथून आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त 3 किलोमीटर अंतराचे चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे.
या उपक्रमात वय 15 वर्षे व त्यावरील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. महा वॉकेथॉनसाठी QR आधारित ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाची लोकचळवळ बळकट करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.
महा वॉकेथॉन व जलसंधारण अभियानाच्या माध्यमातून ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम व्यापक लोकचळवळ करण्याचे नियोजन आहे.
‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ चा मार्ग
सिंधुदुर्गनगरी पोलीस ग्राउंड – डॉन बॉस्को सर्कल- जिल्हा परिषद मुख्य गेट – जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गनगरी नर्सिंग कॉलेज – सिंधुदुर्गनगरी पोलीस ग्राउंड.
नोंदणीसाठी लिंक आणि क्यूआर कोड  https://register.mahaevent.co.in/#/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!