पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली*

*कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली*

* युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार*

*कणकवली : संजना हळदिवे*

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानक या मार्गावर ही रॅली उत्साहात काढण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, यांनी दिली.

या तिरंगा रॅलीमध्ये आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना नेते संजय आंग्रे, अभियानाचे जिल्हाप्रमुख संदीप गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा वर्ग, माजी सैनिक आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.

देशाप्रती प्रेम आणि राष्ट्रभावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, बंड्या नारकर, राजा भुजबळ, सुधीर नकाशे आणि संदीप मेस्त्री यांच्याकडे आहे.

या तिरंगा रॅलीत समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा जागर करावा, असे आवाहन रॅलीच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!