सागरेश्वर बीच येथे रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवरचे लोकार्पण

सागरेश्वर बीच येथे रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवरचे लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस*

*सागरेश्वर बीच येथे रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवरचे लोकार्पण*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

उभादांडा येथील सागरेश्वर बीचवर पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेत रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने सागेरश्वर किनारी “रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवर” जनसेवेसाठी स्थापन केला आहे. याचे उद्घाटन रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. “रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवर” हा उपक्रम कौतुकास्पद असून यापुढेही रोटरीने जनहिताचे उपक्रम राबवा, असे प्रतिपादन श्री.भंडारे यांनी केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजन गवस, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, सन २०२५-२६चे वेंगुर्ला रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे, विद्यमान अध्यक्ष अॅड.प्रथमेश नाईक, असिस्टंट गव्हर्नर डॉ.प्रशांत कोलते, गव्हर्नर अॅड.डॉ.विद्याधर तायशेटे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, शंकर वजराटकर, खजिनदार अनमोल गिरप, दीपक ठाकूर, प्रा.डॉ.वसंतराव पाटोळे, दादा साळगांवकर, ज्येष्ठ नागरिक रवींद्रनाथ आंदुर्लेकर, ग्रा.पं.सदस्य गोविंद परूळेकर व अन्य उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पर्यटन भागात सागरेश्वर किनारी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून उपाययोना करण्यासाठी आर्थिक निधी जमा केला होता. यात ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांनी २५ हजार रू., सन २०२४-२५ मध्ये प्रेसिडेंट योगेश नाईक यांच्या कार्यकाळातील रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचा फंड ३० हजार रू., सन २०२५-२६चे अध्यक्ष आनंद बोवलेकर यांनी १० हजार रू., सचिव डॉ.राजेश्वर उबाळे रू.१० हजार, रंजन पडते रू.१५ हजार, रो. राजेश घाटवळ रू. १० हजार, अनमोल गिरप रू.१० हजार, स्वप्निल झांटये रू.१० हजार, अंकुश गावडे रू.१० हजार, प्रणय तेली रू.१० हजार, डॉ.प्रशांत कोलते रू.१० हजार, डॉ.विद्याधर तायशेटे रू.५ हजार, डॉ.दीपक ठाकूर रू.१० हजार, मृणाल परब रू.५ हजार, डॉ.वसंतराव पाटोळे रू.५ हजार, सदाशिव भेंडवडे रू. ५ हजार असा निधी जमा केला होता.
या टॉवर उभारणीसाठी सन २०२५-२६चे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर आणि सचिव राजेश्वर उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इतर सदस्यांचेही यासाठी सहकार्य लाभले. रोटरी लाइफ सेव्हिंग टॉवरच्या ठिकाणी जीवरक्षक विठोबा परब हे टेहळणीसाठी असणार असून उभादांडा ग्रामपंचायतीचे दोरखंड व अन्य महत्त्वपूर्ण साहित्याचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
फोटोओळी – सागरेश्वर किनारी उभारण्यात आलेल्या “रोटरी लाईफ सेव्हिंग टॉवर’ च्या उद्घाटनप्रसंगी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!